बसवंत मधुक्रांती २०२३ पुरस्कार

ग्रीनझोन ॲग्रोकेम प्रा.लि.संचलित बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २० व २१ मे दरम्यान 'बसवंत मधुक्रांती - २०२३' या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २०१९ पासून सलग हा उपक्रम सुरू असून हे पाचवे वर्ष आहे. मधमाशी पालन क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन, निमंत्रितांचा परिसंवाद त्याचप्रमाणे या व्यवसायातील प्रसारकार्य उद्यमशीलता जोपासणाऱ्या संस्था व व्यक्तींसह महाराष्ट्रातील पाच विभागांमधील मधुउद्योजकांना विशेष पारितोषिके देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

बसवंत गार्डन (मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत ता. निफाड) येथे होणाऱ्या या परिषदेत मधुमक्षिका पालन क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. निवडक सहभागींचे अनुभवकथन व माहितीपूर्ण परिसंवादाचा लाभ यावेळी उपस्थितांना होईल. बसवंत मधुक्रांती- २०२३ पुरस्कारांची निवड ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बी. बी. पवार, 'ग्रीनझोन ॲग्रोकेम'चे टेक्निकल डायरेक्टर डॉ. भास्कर गायकवाड यांच्या समितीने केली.


मधमाशी पालनाच्या प्रसाराचे लक्षणीय कार्य
  • शिवस्फूर्ती प्रोसेसिंग फाऊंडेशन, शहापूर (जि. अमरावती)
कृतिशील मधमाशी पालन प्रचारक
  • दयावान श्रीकांत पाटील, कणेरी मठ (ता. करवीर, जि. कोल्हापूर)
मधुउद्योजक श्रेणीमधील पारितोषिकप्राप्त व्यक्तींची विभागवार निवड अशी :
  • उत्तर महाराष्ट्र :
    ऋषिकेश हरिभाऊ औताडे (श्रीरामपूर, जि. अहमदनगर)
  • विदर्भ :
    योगिता प्रभाकर इंगळे (ता. दर्यापूर, जि. अमरावती)
  • पश्चिम महाराष्ट्र :
    ज्योत्स्ना जयवंतराव देसाई (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर),
  • कोकण :
    राजू इर्शद मंडळ (ता. डहाणू, जि. पालघर)
  • मराठवाडा :
    तेजस सहदेव लिमकर (ता. परांडा, जि. धाराशिव)

बसवंत मधुक्रांती -२०२३
कार्यक्रम पत्रिका

दि.२० मे २०२३ दि.२१ मे २०२३
स. 9.30 ते 10.00 नाव नोंदणी स. 10 ते 11.30 बसवंत मधमाशी उद्यान तसेच बसवंत गार्डनला भेट आणि प्रात्यक्षीक
10 ते 11.30 उद्घाटन सत्र आणि मधुक्रांती पुरस्काराचे वितरण
11.30 ते 11.45 चहापान 11.30 ते 11.45 चहापान
11.45 ते 1.15 तांत्रिक सत्र-1
जागतिक, देशपातळीवरील मधमाशी पालन :
डॉ. तुकाराम निकम,
संचालक, सुप्रकृती मधुशाळा, नाशिक

महाराष्ट्रामध्ये ॲपी टुरिझमला संधी :
श्री. संजय पवार,
कार्यकारी संचालक : ग्रीनझोन ॲग्रोकेम प्रा.लि., नाशिक

आग्या मधमाशीचे संवर्धन आणि मध उत्पादन :
गोपाल पालिवाल,
आग्या मधमाशी तज्ञ, वर्धा
11.45 ते 1.30 तांत्रिक सत्र-3
परागीभवनासाठी मधमाशी सेवा पुरवठा :
डॉ. हरिश शर्मा,
प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. वाय.एस. परमार कृषी विद्यापीठ, सोलन (हिमाचल प्रदेश)

मधमाशी क्लस्टर निर्मिती :
डॉ. देवव्रत शर्मा,
संस्थापक, हायटेक नॅचरल प्रॉडक्ट, मधमाशी तज्ञ- नवी दिल्ली

1.15 ते 2.15 भोजन दु. 1.30 ते 2.30 भोजन
दु. 2.15 ते 4.00 तांत्रिक सत्र-2
बी ब्रीडिंग, मधमाशीच्या वसाहती विभाजन :
श्री. संजीव तोमर,
सेक्रेटरी, तनिष्क ग्रामीण सेवा संघ, उत्तर प्रदेश

व्यापारी तत्त्वावर मधमाशी पालन :
श्री. सुभाष कंबोज,
संस्थापक, कंबोज हनीबी फार्म, यमुनानगर, हरियाणा

मध उत्पादनाची भारतीय आणि जागतिक स्थिती :
श्री मदन शर्मा,
मधमाशी उद्योजक, चंदिगड
दु. 2.30 ते 4.00 तांत्रिक सत्र-4
फुलोरी मधमाशी संवर्धनाचे तंत्रज्ञान :
प्रा. उत्तम सहाणे
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, पालघर

मधमाशीपासून विविध पदार्थांची निर्मिती :
डॉ. धनंजय वाखले,
तांत्रिक अधिकारी (निवृत्त), सीबीआरटीआय, पुणे

महाराष्ट्रातील मधमाशी पालन- सद्य:स्थिती आणि संधी :
डॉ. भास्कर गायकवाड
टेक्निकल डायरेक्टर, ग्रीनझोन ॲग्रोकेम प्रा.लि. नाशिक

बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राचे योगदान :
नितीन कराळे
दु. 4.00 ते 4.15 चहापान 4.00 ते 4.15 चहापान
4.15 ते 5.00 पुरस्कारर्थींचे मनोगत 4.15 ते 5.00 मुक्तचर्चा आणि समारोप