बसवंत द्राक्ष महोत्सव

चित्रकला स्पर्धा

दि. ९ ते १२ मार्च बसवंत गार्डन, पिंपळगाव आयोजित "द्राक्ष महोत्सव" निमित्त बसवंत गार्डन तर्फे शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजित करीत आहोत, त्यातील निवडक चित्र आम्ही प्रदर्शनात मांडणार आहोत. विजेत्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी विद्याथ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.


बक्षीस

प्रथम : रु. ३०००/-
द्वितीय : रु. २०००/-
द्वितीय : रु. २०००/-
उत्तेजनार्थ(०५) : रु. ५००/-



स्पर्धेचे गट आणि विषय

# गट विषय १ विषय २
इ. ५ वी ते ७ वी द्राक्ष घड / डाळिंब / केळी/ पपई / चिक्कू द्राक्ष किंवा डाळिंब बाग
इ. ८ वी ते १० वी द्राक्ष किंवा डाळिंब बाग ग्राम संस्कृती (बैल संस्कृती किंवा 12 बलुतेदारांपैकी एक)
खुला गट द्राक्ष किंवा डाळिंब बाग ग्राम संस्कृती (बैल संस्कृती किंवा 12 बलुतेदारांपैकी एक)



स्पर्धेचे नियम :
  • चित्रकला स्पर्धेसाठी वॉटर कलर किंवा पोस्टर कलर वापरावे.
  • चित्र कार्डशिटवर ११” X १४” साईज मध्येच स्विकारले जाईल.
  • चित्र स्वत: काढलेले असावे. चित्रावर प्राचार्य / वर्गशिक्षक / कलाशिक्षक यांची सही असावी.
  • चित्राच्या मागील बाजूस विद्यार्थ्याचे नांव, पत्ता(पिनकोड सह), इयत्ता व शाळा / महाविद्यालयाचे नांव, संपर्क नंबर (मोबाईल/फोन) याचा उल्लेख असावा.

चित्र दि. ०५ मार्च २०२३ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत.

बसवंत गार्डन,मुखेड रोड, पिंपळगांव बसवंत, ता.निफाड, जि. नाशिक, पिन कोड ४२२२०९ अधिक माहितीसाठी संपर्क :+91 7507757700