कोण होणार मिलांज फळांचा महाराजा?

'सेवर निसर्गोत्सव'



बसवंत गार्डन
येथे विविध जातींच्या द्राक्षांचे भव्य प्रदर्शन व स्पर्धा.

'सेवर निसर्गोत्सव' विविध जातींचे द्राक्षे, डाळिंब आणि केळी यांचे भव्य प्रदर्शन व स्पर्धा प्रिय विक्रेता व शेतकरी बंधूनी, 'पूर्वा केमटेक प्रा. लि.' नाशिक तर्फे आयोजित बसवंत गार्डन पिंपळगांव येथे 'तेवर निरागोत्सव' प्रदर्शनात 'मिलांज फळांबा महाराजा' या नांवाने स्पर्धा भरविण्यात येत आहे. या ठिकाणी उत्कृष्ठ द्राक्ष, डाळिंब, केळी यांचे नमुने आकर्षकरीत्या मांडण्यात येतील त्यांच्यात स्पर्धा ठेवण्यात येणार आहे.

नियम व अटी
स्पर्धा फक्त उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. व्यापाऱ्यांसाठी नाही.
प्रत्येक शेतातील एका जातीचा फक्त एकच नमुना असावा. एका बागेतील दोन किंवा जास्त नमुने आढळल्यास सर्वच नमुने बाद ठरवण्यात येतील.
नमुना घेतलेल्या शेताचा सर्वेनंबर नमुन्याबरोबर देणे आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी एका नमुन्याचे तीन घड आणावेत. त्यातील दोन प्रदर्शनात ठेवण्यासाठी आणि एक परिक्षकांच्या तपासणीसाठी असेल.
घडांच्या बाह्यस्वरूपासोबत त्यांच्या इतरबाबींचासुध्दा विचार करण्यात येईल. (ब्रीक्स, गोडी,चव,स्वाद इ.)
द्राक्ष घड काडीसह असावा. देठाच्या दोन्हीही बाजूंना काडीची लांबी अंदाजे ३-४ सें.मी. (दीड इंच ) असावी.
नमुन्यासोबत पुढील माहिती असावी. शेतकऱ्यांचे पूर्ण नांव, पूर्ण पत्ता, फोन नंबर / मोबाईल नंबर, द्राक्षाची जात, त्या जातीखालील अंदाजे क्षेत्र
नमुने प्रदर्शनाच्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत प्रदर्शनस्थळी स्वीकारले जातील.
परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.



बक्षिसे
द्राक्ष हिरवा गट : मिलांज द्राक्ष महाराजा रु. ५००१/-
गट प्रथम द्वितीय तृतीय
गोल रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
लांब रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
द्राक्ष रंगीत गट : मिलांज द्राक्ष महाराजा रु. ५००१/-
गट प्रथम द्वितीय तृतीय
गोल द्राक्ष काळा रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
लांब द्राक्ष काळा रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
इतर जाती रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
मिलांज डाळिंब महाराजा रु. ५००१/-
गट प्रथम द्वितीय तृतीय
भगवा रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
गणेश रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
आरक्ता, सोलापूर रेड या काही नमुन्यासाठी
उत्तेजनार्थ रु. १००१/- ची पाच बक्षिसे.
मिलांज बनाना किंग रु. ५००१/-
गट प्रथम द्वितीय तृतीय
केळी रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
उत्तेजनार्थ रु. ५०१/- ची पाच बक्षिसे.